इस्रायलला मोठा झटका : ‘या’ तीन युरोपीयन राष्ट्रांची स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राला सहमती | पुढारी

इस्रायलला मोठा झटका : 'या' तीन युरोपीयन राष्ट्रांची स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राला सहमती

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या तीन महत्त्वाच्या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार असल्याचे म्हटले आहे. या घडमोडींमुळे इस्रायलला मोठा धक्का बसला असून या तिन्ही देशांतून इस्रायलने आपले राजदूत माघारी बोलवले आहेत. ‘मध्यपूर्वे’तील शांततेसाठी आपण हे पाऊल उचलत आहोत, असे या तीन देशांनी म्हटले आहे. Palestinian state

  • नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या तीन देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार
  • या तिन्ही देशांतून इस्रायलने आपले राजदूत माघारी बोलवले आहेत

दोन राष्ट्रांचा पर्याय हाच इस्रायलच्याही हिताचा

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास घर स्टोर म्हणाले, “दोन राष्ट्रांचा पर्याय हाच इस्रायलच्याही हिताचा आहे, त्यामुळे आम्ही २८ मेरोजी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. जर ही मान्यात दिली नाही, तर मध्यपूर्वेत कधीही शांतता नांदणार नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांना चांगला राजकीय उपाय देणारा पर्याय द्यावा लागेल. शांतता आणि सुरक्षा असलेले दोन शेजारी राष्ट्रं हाच याला पर्याय आहे.” ते म्हणाले, “अशी मान्यता देणे म्हणजे पॅलेस्टाईनमधील मध्यम मार्गी शक्तींना पाठबळ देणे असे आहे, सततच्या संघर्षामुळे पॅलेस्टाईनमधील मध्यम मार्गी नेतृत्व मागे फेकले गेले आहे. पॅलेस्टाईनला मान्यता दिली नाही तर मध्यपूर्वेत कधीही शांतात नांदणार नाही. या युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत, त्यामुळे जो एकमेव पर्याय आहे, तो आपल्याला जीवित ठेवला पाहिजे.”

नार्वेने ही घोषणा केल्यानंतर आयर्लंडचे पंतप्रधान सिमॉन हॅरिस यांनीही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, “आर्यलँड, नॉर्वे आणि स्पेन पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता देणार आहोत. इतरही देश आमची भूमिका उचलून धरतील अशी अपेक्षा आहे.” तर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅनचेज यांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यात देणार असल्याचे म्हटले आहे. स्पेन हा निर्णय २८ मेरोजी घेणार आहे. पेड्रो यांनी संसदेत इस्रालयचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली.माल्टा आणि सोल्हेनिया हे देशही लवकर पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता देणार असल्याचे, अल जझिरा या वृत्त वाहिनेने म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button