नगर : पावसामुळे रस्त्यांची झाली दैनावस्था | पुढारी

नगर : पावसामुळे रस्त्यांची झाली दैनावस्था

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यापासून पडत असलेले पावसामुळे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या वरील रहदारीचे असणारे रोड चिखलमय झाले असून या रोड वरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करून जावे लागत आहे. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे प्रवरा परिसरातील ग्रामीण भागातील अनेक भागात मुसळधार काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी अजूनही रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे ग्रामीण भागात असणारे वाड्या-वस्त्या वरील रहदारीसाठी उपयुक्त असणारे रस्ते सध्या चिखलमय झालेले आहेत.

या रस्त्यावरून प्रवास करताना शेतकरी, नागरिक, शाळेतील विद्यार्थी त्यांना गावाकडे जाण्यासाठी मोठी कसरत करून गावाकडे जावे लागत असून यामध्ये अनेक शेतकरी हे दूध व्यवसाय करीत असल्यामुळे अशा नागरिकांना दुधाच्या किटल्या घेऊन जाताना रोडवर चिखल असल्यामुळे त्यातून कशीबशी वाट काढत जावे लागत असून यामध्ये काही शेतकरी पडल्याचे हे चित्र पाहावयास मिळत आहे.

एकूणच ग्रामीण भागातील रस्ते हे चिखलमय झाले असून यासाठी स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर अशा दुरावस्था झालेल्या रोडचे कामे करावे अन्यथा या रोडवर मुरूम तरी टाकावा, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे. तसेच पडलेल्या पावसामुळे अनेक भागात रोगराईच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसत असून थंडी, ताप येणे, खोकला हात- पाय दुखणे यासारखे आजार वाढू लागले असल्याचे चित्र ही ग्रामीण भागात दिसू लागले आहे.

यासाठी गावात जंतुनाशक धूर फवारणी करण्यात यावी, अशीही मागणी ग्रामीण भागातील नागरिक सध्या करीत आहेत. तसेच पावसामुळे स्थानिक गावातील विहिरींच्या पाणी ही काही प्रमाणात खराब झाले असल्यामुळे साथीचे आजारात वाढ झालेली आहे.

Back to top button