नगर : अन्वी ठरली सर्वांत लहान गिर्याराहक | पुढारी

नगर : अन्वी ठरली सर्वांत लहान गिर्याराहक

नगर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर करणारी अडीच वर्षांची अन्वी घाटगे ही सर्वांत लहान गिर्यारोहक ठरली आहे. अन्वीने नगरमधील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने हा विक्रम केला.

अवघ्या 3 तासांमध्ये हे अंतर पूर्ण करत गिर्यारोहण क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला. तिचा ट्रेकयात्रींकडून प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे तेजस स्वामी, रवींद्र चोभे, अक्षय भापकर, बारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अन्वीचे कौतुक केले.

हेही वाचा

माेठी बातमी : शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास

आता तुम्हाला सुट्टीच : विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची कोपरखळी

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

Back to top button