Ajit Pawar
Latest
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड
मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली आहे. आज विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. आज सभागृहात विधानसभा विरोधी पक्षनेतेच्या नावावर अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तुमचा जो जोश असायचा, तो उत्साह कायम आहे, असे फडणवीसांचे कौतुक अजित पवार यांनी केले. फडणवीसांच्या भाषणाबद्दल अजित पवार यांनी कौतुक केले. अडीच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्रीही झाले, असेही फडणवीस म्हणाले.
सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेला नाही. गेल्या मंत्रिमंडळात शिंदेंना एकच मंत्रालय का? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

