गर्जा महाराष्ट्र माझा…; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन | पुढारी

गर्जा महाराष्ट्र माझा...; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.१) ६४ वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांना मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हुतात्मा स्माराकात आल्यानंतर ऊर्जा मिळते. हुतात्म्यांच बलिदान वाया जावू देणार नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे. राज्याला एक परंपरा आहे. निवडणुका येतात जातात; परंतु शेवटी आपली परंपरा आणि आरोप प्रत्यारोपाची पातळी खालावली आहे. विरोधकांकडून शिव्याशाप याशिवाय़ काही पाहायला मिळत नाही. विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय काही राहील नाही. काम करणाऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र नेहमी उभा राहिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व गिरणी कामगारांना घरे देणार

मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबईतील पात्र सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याची घोषणा केली. “मुंबई कामगारांच्या मेहनतीने आणि कष्टाने उभी राहिली आहे. आमचे सरकार जवळपास ५ हजार कामगारांना घरे वाटप करण्यात यशस्वी झाले. जेवढे पात्र गिरणी कामगार आहेत त्या सर्वांना जिथे आवश्यक आहे तिथे घरे देणार आहोत, असे अश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा : 

Back to top button