सावधान! राज्यात उष्णतेचा कहर; पुणे चाळीशीपार, कोकणात पावसाचा इशारा | पुढारी

सावधान! राज्यात उष्णतेचा कहर; पुणे चाळीशीपार, कोकणात पावसाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारपासूनच राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव आणि पुण्यातील तळेगाव ढमढेरेचे तापमान 44 अंशांवर गेल्याने हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राज्यात जणू उष्णतेचा वणवाच पेटला आहे. दरम्यान, कोकणात 4 मेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. वार्‍याची द्रोणीय रेषा दक्षिणपूर्व मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत जात आहे.

ही रेषा विदर्भ, मराठवाड्यातूनही जात असली तरी त्या भागात 1 मे रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र कोकणात 4 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी कोकणसह राज्यात सर्वत्र कमाल तापमानात मोठी वाढ झाली. यात उत्तर, मध्य महाराष्ट्रात पारा प्रथमच 44 अंशावर गेला. त्यामुळे हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

मंगळवारचे कमाल तापमान

मालेगाव 44, तळेगाव ढमढेरे (पुणे) 44, पुणे 41.8, अहमदनगर 40.2, कोल्हापूर 39.4, महाबळेश्वर 33.6, नाशिक 39.4, सांगली 41, सातारा 40.7, सोलापूर 42.9, छ. संभाजीनगर 41.4, परभणी 40.8, नांदेड 42.8, बीड 42, अकोला 42.3, चंद्रपूर 41.8, गोंदिया 38.2, नागपूर 40.1, वर्धा 41.

हेही वाचा

 

Back to top button