panchganga pollution : राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा फेसाळली | पुढारी

panchganga pollution : राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा फेसाळली

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीतील प्रदूषण (panchganga pollution) दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नदी फेसाळत आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्यात फेस आल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

पंचगंगेच्या पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन वेगवेगळे उपाय करत आहे, पाणी प्रदूषणाची मात्रा कमी होताना दिसत नाही. नदी प्रदूषणात सतत वाढ होत आहे, बुधवारी रात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने पंचगंगा दुथडी भरून वाहत आहे.

राजाराम बंधाऱ्याच्या दक्षिणेला दुथडी भरुन वाहणारी पंचगंगा तर उत्तरेला फेसाळणारे पाणी अशी काहीशी विचित्र स्थिती गुरुवारी दिवसभर राजाराम बंधारा परिसरात पाहायला मिळाली. प्रदूषणामुळेच पंचगंगा नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.

राजाराम बंधारा येथे नदी पात्रात कधी कचरा तर कधी पाण्याचा उग्र दर्प येतो. कोल्हापूर शहरातील अनेक गटारींचे पाणी अनेक ठिकाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याने मासे मृत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्रातील पाणी पातळी कमी होती पाण्याला काळपट रंग आणि दर्पही येत होता. राजाराम बंधारा जवळ आजही गटारांचे पाणी नदीपात्रात थेट मिसळत आहे. रात्रीच्या पावसाने ओसंडून वाहणारा जयंती नाला नदीपात्रात थेट मिसळत आहे.

पंचगंगा प्रदूषण ( panchganga pollution ) मुक्तीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे बरोबर काही सामाजिक संस्था उपक्रम राबवत आहेत. पण दुसरीकडे नदी प्रदूषणाबाबत नागरिक फारसे जागरूक नसल्याचे अनुभवास येत आहे, घरातील निर्माल्य, खराब फुले, फळे नदीपात्रात टाकणे सुरूच आहे. जनावरे, गाड्या नदीपात्रात धुण्यासाठी त्याचबरोबर धुणी धुण्यासाठी जणू बंधाऱ्यावर स्पर्धाच असते.

हेही वाचा : 

Back to top button