Gujarat Rain Update : गुजरातमधील गिर सोमनाथमध्ये १० ते १५ बोटी बुडाल्याची शक्यता | पुढारी

Gujarat Rain Update : गुजरातमधील गिर सोमनाथमध्ये १० ते १५ बोटी बुडाल्याची शक्यता

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन

गुजरातमधील (Gujarat Rain Update) गिर सोमनाथ येथे काल १० ते १५ बोटी बुडाल्याची माहिती समोर येत आहे. गिर सोमनाथ येथे मागील २४ तासात प्रचंड पाऊस झाल्याने ही घटना घडली आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे १० ते १५ बोटी समुद्रात अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बोटीत काही मच्छीमार अडल्याने भिती व्यक्त करण्यात येत असून बोटींमध्ये किमान १० मच्छीमार असल्याचे बोलले जात आहे. बिघडलेले हवामान पाहता, हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.

Gujarat Rain Update : पुढच्या दोन दिवसांत पाऊस

मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र, गुजरातमध्ये समुद्र किनारी भागात पाऊस सूरू आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

मच्छीमारांनाही पुढील ५ दिवस खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ओडिसा आणि आंध्रप्रदेशमध्ये ‘जवाद’ नावाच्या चक्रिवादळामुळे धोका असण्याची शक्यता आहे.

अहमदाबादमध्ये हवामान खात्याच्या अधिकारी मनोरमा मोहंती म्हणाल्या की, गुजरातमध्ये ३० नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. याच बरोबर ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत मच्छीमारांना उत्तर आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागात मोठा पाऊस असल्याची शक्यता मोहंती यांनी दिला आहे.

Gujarat Rain Update : या जिल्ह्यांना यलो अलर्ट

कोकणातल्या उर्वरित आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, आणि उस्मानाबाद या तब्बल 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मच्छिमारांना इशारा

मच्छिमारांनाही येत्या 24 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

तापमान घटले

राज्यभरात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली.

राज्यात सर्वाधिक 34.5 अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत तर सर्वात कमी तापमान गोंदियात 12.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

Back to top button