यवतमाळ : विजेच्या तीव्र धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू | पुढारी

यवतमाळ : विजेच्या तीव्र धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : कुलरचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आर्णी तालुक्यातील दाभडी येथे मंगळवारी (दि.६) सायंकाळी घडली. वनिता सुनील राठोड (वय ३५) आणि कुणाल सुनील राठोड (वय ९)  अशी मृत मायलेकांची नावे आहेत.

आई मुलाला वाचवायला गेली अन….

माहितीनुसार, वनिता या नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतातून घरी आल्या. प्रचंड उकाडा असल्याने  त्यांनी मुलगा कुणाल याला कुलर लावण्यास सांगितले. कुणालने बटण सुरू करताच त्याला शॉक लागला आणि त्याचवेळी त्याच्या अंगावर कुलर पडला. हा प्रकार पाहताच वनिता यांनी कुलर उचलण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांनाही शॉक लागला. घर मातीचे असल्याने कुलरच्या पाण्यामुळे जमिनीला ओल आली होती. त्यामुळे कुलर सुरू करण्यासाठी गेलेल्या कुणाल याला शॉक लागल्याचे सांगण्यात आले. दोघांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोगांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा 

Back to top button