Shyamsundar Gupta : श्यामसुंदर गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला | पुढारी

Shyamsundar Gupta : श्यामसुंदर गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला

रोहे, रायगड: मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक म्हणून श्यामसुंदर गुप्ता यांनी आज (दि.५) पदभार स्वीकारला. मुकुल जैन ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागी गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी गुप्ता उत्तर रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (सिस्टम्स) म्हणून कार्यरत होते. (Shyamsundar Gupta)

भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवा १९९२ बॅचचे अधिकारी असलेले श्यामसुंदर गुप्ता यांनी पश्चिम रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेवर रेल्वे परीचालनाच्या विविध पदावर काम केले आहे. मुख्य मालवाहतूक व्यवस्थापक, मध्य रेल्वे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक, मध्य तसेच पश्चिम रेल्वे मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक (मालवाहतूक), मध्य रेल्वे मुख्य वाहतूक नियोजन व्यवस्थापक, मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी, आदी विविध पदांवर काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. (Shyamsundar Gupta)

त्यांनी मुख्य परिवहन व्यवस्थापक (पेट्रोलियम), पश्चिम रेल्वे, वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे, कोलकाता म्हणूनही काम केले आहे. आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत त्यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.

गुप्ता यांनी INSEAD सिंगापूर आणि ICLIF, मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमासह विविध सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला आहे. गुप्ता यांना भारतातील लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमची सखोल माहिती आहे. २००१ मध्ये प्रतिष्ठित रेल्वे मंत्री पुरस्कार, २०१० मध्ये जनरल मॅनेजर अवॉर्ड आणि ३२व्या ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये सुवर्णपदक मिळाले आहे.

हेही वाचा 

Back to top button