वंश-आधारित महाविद्यालयीन प्रवेश बंद करण्याच्या निर्णयाशी असहमत : जो बायडेन | पुढारी

वंश-आधारित महाविद्यालयीन प्रवेश बंद करण्याच्या निर्णयाशी असहमत : जो बायडेन

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूएस सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि.२९) हार्वर्ड विद्यापीठ आणि नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील वंश-आधारित प्रवेश कार्यक्रम रद्द केल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे. “वंश-आधारित प्रवेश कार्यक्रम बंद करण्याच्या यूएस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी असहमत” असल्याचे  अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हंटले आहे.  यूएस सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून आणि दोन्ही बाजूंनी उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्राध्यक्ष बायडेन काय म्हणाले?

अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी (दि.३०) सांगितले की,” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी ते असहमत आहेत. यामुळे अमेरिकन आफ्रिकन अल्पसंख्याकांना कमी संधी मिळेल. यामुळे त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार नाही. या निर्णयामुळे विषमतेला चालना मिळणार आहे.” पुढे बोलताना म्हणाले की, “अमेरिकेत अजूनही भेदभाव आहे. हा निर्णय न्यायालयाचा निर्णय भेदभाव आणि अन्यायाला चालना देणारा ठरेल. त्याचबरोबर अनेक दशकांच्या भूतकाळातील आणि महत्त्वपूर्ण प्रगतीला मागे टाकतो.

जाणून घ्या  ट्रम्प , ओबामा यांच मत काय आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी न्यायालयाच्या निर्णयाशी तीव्र असहमती दर्शवली. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनीही न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती दर्शवली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही याचे समर्थन केले नाही. त्या म्हणाल्या की, ही संधी नाकारण्यासारखे आहे. एकीकडे या निर्णयाचे समर्थन करताना रिपब्लिकन पक्ष आनंदी आहेत, तर डेमोक्रॅट्स विचाराच्या लोकांना याला विषमता आणखी वाढवणारा निर्णय म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button