Senthil Balaji : तमिळनाडूचे वीज मंत्री सेंथील बालाजी यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी! राज्यपालांचे आदेश | पुढारी

Senthil Balaji : तमिळनाडूचे वीज मंत्री सेंथील बालाजी यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी! राज्यपालांचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे व्ही. सेंथिल बालाजी यांच्याबाबतीत मोठी माहिती समोर आली आहे. तमिळनाडूच्या राज्यपालांनी बालाजी यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्याची माहिती दिली आहे.

तमिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी कारवाई सुरु आहे. यामध्ये नोकरीच्या बदल्यात पैसे घेणे आणि मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांच्यावर आहेत. आज (दि. २९) तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी बालाजी यांना आज मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्याचे जाहीर केले आहे. राज्यपालांनी दिलेल्या निर्णयानंतर सीएम स्टॅलिन संतापले आहेत.

बुधवारी (दि. २८) चेन्नई सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. अली यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता सेंथिल बालाजी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा

Back to top button