Virender Sehwag on World Cup 2023 : ‘या’ दोन संघांमध्ये होणार वर्ल्डकप फायनल; वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी

Virender Sehwag on World Cup 2023
Virender Sehwag on World Cup 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे शेड्युल जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबर पासून विश्वचषक स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील मागील वर्ल्डकपच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांमध्ये होणार आहे. या विश्वचषकातील सर्व सामने भारतात खेळवले जाणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामने भारतात खेळवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विश्वचषकात १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आमने सामने असणार आहेत. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेचे शेड्युल जाहीर झाल्यानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने मोठी भविष्यवाणी केली आहे.  (Virender Sehwag on World Cup 2023)

२०२३ च्या विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने असतील, अशी भविष्यवाणी वीरेंद्र सेहवागने केली आहे. तर श्रीलंकेचा माजी कर्मधार मुथय्या मुरलीधरन यानेही याबाबत भाष्य केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच अंतिम सामना होईल, असे मुरलीधरनही म्हणाला आहे. (Virender Sehwag on World Cup 2023)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news