पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी | पुढारी

पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे.

निजामपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलिसात फिर्यादीनुसार त्यांची मुलगी गावात क्लासला जात असतांना तिचा रस्ता अडविणे, हातवारे करणे, तिचा मानसिक छळ करणे असा प्रकार सुमारे एक वर्ष पासून सुरू होता. निजामपूर गावातीलच रहिवासी असलेले चौघे तिला त्रास देत होते. तसेच त्यातील एकजण हा नेहमी मुलीला रस्त्यात अडवून धमकावत होता. त्यानंतर दि.३० मे रोजी मुलगी क्लासला जात असताना चौघांपैकी एकाने मुलीला चॉकलेटचे आमिश देत धमकी दिली. यावेळी देखील त्याचे चौघे मित्र सोबत होते. मुलीने सदर प्रकार आपल्या आईकडे सांगितला. अल्पवयीन मुलीच्या आईने तत्काळ निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार निजामपूर येथील चौघे अल्पवयीलन (सर्व रा. निजामपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हे १५ ते १८ वयोगटातील असून दोघांनी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी चारही संशयितांना अटक करून त्यांची रवानगी धुळे बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button