पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे गटाचे नेते (Leader of Shiv Sena Uddhav Thackeray faction) आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या विरोधात मुंबई न्यायालयात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. २०२२ पासून सोमय्या त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आपल्याविरोधात बदनामीकारक ट्विट करत असल्याचे राऊत यांनी याचिकेत म्हटले आहे. ( Sanjay Raut vs Kirit Somaiya)
"जेव्हा मी सोमय्या यांच्या ट्विटर अकाऊंटवर माझ्या विरोधातील बदनामीकारक वक्तव्य केलेले ट्विट पाहिले तेव्हा मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटले. कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्याविरुद्ध केलेली बदनामीकारक विधाने समाजाच्या आणि सर्वसामान्यांच्या नजरेत माझी प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राऊत यांनी पुढे म्हटले आहे. ट्विटरवरील बदनामीकारक ट्विट्स सार्वजनिकरित्या माझी प्रतिमा डागाळण्यासाठी केली गेली होती आणि ती अजूनही सोमय्या यांच्या ट्विटर पेजवर उपलब्ध आहेत, असा दावाही राऊत यांनी केला आहे.
" कोणताही पुरावा नसताना ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या माझी बदनामी करत आहेत," असे राऊत यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, ५०० अन्वये तक्रारीची दखल घेऊन सोमय्या यांना संशयित आरोपी म्हणून समन्स बजावण्याची विनंती राऊत यांनी मुलुंड, मुंबई येथील दंडाधिकार्यांकडे केली आहे. ( Sanjay Raut vs Kirit Somaiya)
याआधी संजय राऊत यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. खासदार राऊत यांनी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्या प्रकरणी आरोप केले होते. राऊत यांनी जे आरोप केले आहेत त्यामुळे बदनामी झाल्याचा दावा मेधा सोमय्या यांनी तक्रारीतून केला होता.
हे ही वाचा :