Indigo Flight : धक्कादायक! इंडिगोच्या विमानाचा मागचा भाग जमिनीवर आदळला आणि… | पुढारी

Indigo Flight : धक्कादायक! इंडिगोच्या विमानाचा मागचा भाग जमिनीवर आदळला आणि...

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 13 : Indigo Flight : कोलकाता येथून दिल्लीला येत असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचा मागचा भाग दिल्ली विमानतळावर जमिनीवर आदळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी झालेल्या या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या विमानाला उड्डाण करण्यास आता हवाई वाहतूक महासंचलनालयाने (डीजीसीए) मनाई केली आहे.
इंडिगोचे ए 321 – 252 एनएक्स निओ जातीचे विमान दिल्ली विमानतळावरील 27 क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक विमानाचा मागचा भाग जमिनीवर आपटला. सुदैवाची बाब म्हणजे यात विमानाचे फारसे नुकसान झाले नाही आणि प्रवाशांनाही दुखापत झाली नाही. या प्रकरणाची डीजीसीएने चौकशी सुरू केली आहे. घटना घडली, त्यावेळी जे कर्मचारी विमानात होते, त्यांनाही पुढील उड्डाणावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. Indigo Flight

Back to top button