नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट | पुढारी

नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये ई – नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना अटक केली होती. या प्रकरणी खटला सुरू असून, चुंभळे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, ऐन बाजार समितीच्या निवडणुकीच्या काळातच वॉरंट आल्याने चुंभळे गटाला धक्का बसला आहे.

नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर या बाजार समितींना राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ई-नाम योजनेचे काम सुरू झाले. या योजनेत समावेश झाल्याने कामाचा व्यापही वाढला. याकामी १० कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. या भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्यात आपण कायमस्वरूपीही होऊ शकतो अशी आस लागली होती. काही दिवसांपूर्वी याच ई-नाम योजनेतील पाच कर्मचाऱ्यांना काही कारणास्तव काढून टाकण्यात आले. पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. यातील मूळ पेठकडील राहुल थोरात यांनी सभापती चुंभळे यांना रुजू करून घेण्याची विनंती केली असता चुंभळे यांनी त्यांच्याकडे अंदाजे १० लाख रुपये लाचेची मागणी केली. यात तडजोड होऊन सुरुवातीस तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ ऑगस्ट २०१९ रोजी माजी सभापती शिवाजी चुंभळे तीन लाखांची लाच घेताना पकडले. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेली ई-नाम योजना कंत्राटी कर्मचारी योजना चुंभळे यांना जड पडली होती. हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश – ८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांच्या कोर्टात आहे. शनिवारी (दि. १५) चुंभळे यांच्या नावे अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना आदेश देण्यात आले आहेत. यात म्हटले आहे की, शिवाजी चुंभळे २६ जून रोजी हजर राहतील याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बाजार समितीचे राजकारण चांगलेच तापले
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. या निवडणुकीत आजी-माजी खासदार आमने-सामने असले तरी खरी लढत ही पिंगळे – चुंभळे अशीच आहे. शनिवारी (दि. १५) माजी सभापती शिवाजी चुंभळेंना न्यायालयात सुरू असलेल्या विशेष खटल्यात अटक वॉरंट जारी झाले आहे, याने बाजार समिती राजकारण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा:

Back to top button
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत हो तुलाच पाहायला आलोय कितीदा प्रेमात पाडशील संस्कृती हॉट शालिनीनं जंगलात लावली आग… हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नुसरत भरुचाचा किलर अवतार! हॉट पूजा गौरचे साडीतील सोज्वळ रूप पाहिले का ? (web story) हॉट दिशा पटानीची व्हायरल किक (Video) हॉट क्रितीचा ऑरेंज फ्लोलर रफलमध्ये भन्नाट देशी लूक हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा हेमांगी कवी – ये Pool राणी, असचं तुझ्यासारखं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे हे काय! झगा मगा मला बघा
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत