कर्जतमध्ये वाळू तस्करांवर छापा; 50 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

कर्जतमध्ये वाळू तस्करांवर छापा; 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राक्षसवाडी तलावात जेसीबीच्या साह्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. दोन जेसीबी व दोन टेम्पो व एक ब्रास वाळू असा 50 लाख वीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच एक जेसीबी व ट्रॅक्टरवरील चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

याप्रकरणी सागर राजेश शिंदे (वय 27, रा. वडळी, ता. श्रीगोंदा) व शुभम दत्तात्रय अधोरे (वय 24, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) यांना ताब्यात घेतले आहे. संतोष ऊर्फ बंटी कोथंबिरे (रा. साळनदेवी रोड, ता. श्रीगोंदा) याच्या सांगण्यावरून वाळू उपसा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

राक्षसवाडी तलावातून रॉयल्टी न भरता शासकीय मालकीच्या वाळूचे अवैध उत्खनन व चोरी करून पर्यावरणाचे नुकसान आरोपींनी केले. पन्नास लाख वीस हजार रुपये किंमतीचे दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टर टॉली व एक ब्रास वाळू जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button