Devendra Fadnavis: ‘बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न’- देवेंद्र फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis: 'बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न'- देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन: आम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाला प्राधान्य देत आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बाबासाहेबांना चैत्यभूमीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री स्वत:हून यामध्ये लक्ष घालत आहेत. ते दर १५ दिवसांनी या स्मारकाच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे लवकरच स्मारक पूर्ण होईल. जगाला हेवा वाटेल, असे बाबासाहेबांचे स्मारक बनवू, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भारताची ‘राज्यघटना’ सर्वोच्च स्थानी असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. लंडनमध्ये शिक्षण घेताना ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले तिथे संग्राहलय उभे करण्यासाठी केंद्राने विशेष सहाय्य होत असल्याचेही फडणवीस यांनी याप्रसंगी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button