Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी | पुढारी

Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून गुरुवार (दि.13) ते बुधवार (दि.१९)पर्यंत दररोज सायंकाळी सातला छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष जयश्री बस्ते, मुख्य संयोजक सुनील कांबळे यांनी दिली. त्यात शुक्रवारी (दि. १४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत १३२ तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुकीच्या चित्ररथाचे स्वागत होणार आहे.

गुरुवारी (दि.१३) सायंकाळी सातला प्रज्ञा प्रबोधन संगीतमय कार्यक्रम झाला. तर शनिवारी (दि.१५) भीमक्रांतीचा कारवा हा सांस्कृतिक कार्यक्रम, रविवारी (दि.१६) भीम का जलवा सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवारी (दि.१७) भीमसंध्या ऑर्केस्ट्रा, मंगळवारी (दि. १८) भीमाचा आवाज सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवारी (दि.१९) भीमाचा किल्ला मजबूत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष जयश्री बस्ते, कार्याध्यक्ष शीलाबाई पाटील, उपाध्यक्ष ज्योती जाधव, सरचिटणीस मोनिका गांगुर्डे, खजिनदार संगीता मोरे, अतुल भावसार, संजय पगारे, अशोक आव्हाड, शशिकांत उन्हवणे, प्रेमनाथ पवार, रवींद्र पाटील, अरुण वाघमारे, शालिग्राम बनसोडे, राजन धिवर, रंगनाथ जाधव, योगेश कांबळे, हर्षवर्धन दिवेकर, वंदना मोहिते, छाया कहाने, अर्चना परदेशी, अंजना टिळे, वंदना आहिरे, आश्विनी गरुड, सुनीता कदम, योगिता बस्ते, रिना चंद्रमोरे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button