FIR against Chetan Ahimsa: ‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर गुन्हा दाखल | पुढारी

FIR against Chetan Ahimsa: 'कांतारा' फेम अभिनेता चेतन अहिंसावर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन: साऊथची फिल्म ‘कांतारा’ ही बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाल्याने दिवसेंदिवस याची कमाई वाढत आहे, पण दुसऱ्या बाजूला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकतानाही दिसत आहे. या चित्रपटात ‘भूत कोला’ ही परंपरा दाखवण्यात आली आहे. या परंपरेवर व्यक्त होताना, या चित्रपटातील कन्नड अभिनेता चेतन अहिंसा याने सोशल मिडियावर एक पोस्ट करत, ‘भूत कोला’ परंपरा हिंदू धर्माचा भाग नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच वाढला आहे.

अभिनेता चेतन याच्या वक्तव्यावरून कर्नाटकातील हिंदूंच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे हिंदू जागरण वेदिकेने उडुप्पी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात या अभिनेत्याविरूद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलीसांनी अभिनेता चेतन अहिंसा याला पोलिस ठाण्यात बोलावून वक्तव्य न करण्याचे आवाहान केले आहे.

चेतन अंहिसाने ‘कंतारा’चे दिग्दर्शक आणि नायक ऋषभ शेट्टीच्या विधानावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांने म्हटले होते की, भूत कोलाची परंपरा ही हिंदू धर्माचा भाग नाही आणि ती हिंदू धर्म अस्तित्वात येण्याच्या आधीही होती. ज्याप्रमाणे हिंदू भाषा लादता येत नाही, त्याचप्रमाणे हिंदुत्व लोकांवर लादता येत नाही, असेही त्याने म्हटले आहे. भूत कोला ही देशातील मूळ रहिवाशांची परंपरा आहे. ही फक्त हिंदू धर्मातच येणार नसल्याचेही त्याने म्हटले आहे. त्याच्या याच व्यक्तव्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्‍याचे तक्रारीत म्‍हटलं आहे.

हेही वाचा:

Back to top button