लग्नाच्या बहाण्याने युवतीच्या धर्मांतराचा आरोप; कर्नाटकात मुस्लिम युवकावर गुन्हा – Anti-Conversion Law)

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन – कर्नाटकातील बंगळुरूमधील यशवंतपूर येथे २४ वर्षांच्या मुस्लिम युवकाला अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या बहाण्याने १९ वर्षीय युवतीचे धर्मांतर केल्याचा आरोप या युवकावर आहे. कर्नाटकात नुकताच लागू करण्यात आलेल्या Protection of Right to Freedom of Religion Act नुसार नोंद झालेला कर्नाटक राज्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. हा युवक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सय्यद मोमिन असे या युवकाचे नाव आहे. India Todayने ही बातमी दिली आहे. (Anti-Conversion Law)

या प्रकरणातील तरुणीचे वय १९ आहे. ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने ५ ऑक्टोबरला यशवंतपूर पोलिसस्टेशनला दिली होती. या तक्रारीनुसार ८ ऑक्टोबरला सय्यद मोमीनची चौकशी झाली. त्यानंतर १३ ऑक्टोबरला आईने आपल्या मुलीचे धर्मांतर केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दिली. लग्नाच्या बहाण्याने धर्मांतर केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे. त्यानुसार Protection of Right to Freedom of Religion Actच्या कलम ५ नुसार या युवकावर गुन्हा नोंद करून ताब्यात घेण्यात आले.

या युवतीचे धर्मांतर आंध्र प्रदेशातील पेनुगोंडामध्ये झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये ३० सप्टेंबरला हा धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news