कर्नाटक मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती

कर्नाटक मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
कर्नाटक मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला असून त्याची चर्चा करण्यासाठी मी लवकरच दिल्लीला जात आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष माजी खा. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री बोम्मई यांचे आज शनिवारी दुपारी येथील सांबरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

बोम्मई म्हणाले की, कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच दिल्लीला जात आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यासाठी काय आहे, असे विचारता त्यांनी यासंदर्भात थोडे थांबा असा सल्ला दिला. माजी खा. प्रभाकर कोरे यांनी शैक्षणिक, आरोग्य आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये दिलेले योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यांचे चार दशकातील काम हे खूपच मोठे, कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news