अनु मलिक यांना ट्रोलर्सनी सोशल मीडियावर सुनावले खडेबोल! | पुढारी

अनु मलिक यांना ट्रोलर्सनी सोशल मीडियावर सुनावले खडेबोल!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अनु मलिक यांना ट्रोलर्सनी सोशल मीडियावर खडेबोल सुनावले आहेत. अनु मलिक यांच्यावर पुन्हा एकदा गाण्याचा सूर चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया युजर्सनी त्यांना या प्रकारावरून खरे-खोटे सुनावले.

अधिक वाचा – 

रविवारी इस्त्राइलचे जिमनॅस्ट डोल्गोपयातने जिम्नॅस्टिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. थोड्या वेळानंतर ॲवॉर्ड सेरेमनी झाला. त्यावेळी मलिक ट्रोल झाले.

अधिक वाचा – 

सूर चोरल्याचा आरोप

जिमनॅस्ट डोल्गोपयातच्या गळ्यात गोल्ड मेडल घालण्यात आले. त्यावेळी इस्त्राएलचे नॅशनल एंथम ‘हातिकवाह’ वाजू लागले. युजर्सना त्याचे सूर हूबेहूब एका गाण्याचे वाटू लागले. १९९६ मधील चित्रपट दिलजलेमध्ये ‘मेरा मुल्क मेरा देश है’ या गाण्याशी ते मिळते -जुळते होते. त्यावेळी युजर्सना मलिक यांची आठवण आली.

मलिक यांनी हा सूर ‘मेरा मुल्‍क मेरा देश..’ साठी वापरले होते. अनेक लोकांना ही गोष्ट पहिल्यांदाच माहिती झाली. लोक ट्विटरवर केवळ आश्चर्यच व्यक्त करत नाहीत. तर त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.

अधिक वाचा – 

त्यांच्यावर सूर चोरण्याचा आरोप करू लागले. काही युजर्स म्हणत आहेत की, मलिक यांना कॉपी करण्यासाठी दुसऱ्या देशाचे राष्ट्रगीतचं मिळाले का?

इटालियन गाणे ‘ला मंटोवना’शी प्रेरित इस्त्राएलचे राष्ट्रगीत

मीडिया रिपोर्टनुसार, मजेशीर गोष्ट म्हणजे, ‘हातिकवाह’चे सूरदेखील खरे नाहीत. त्याचे संगीत १६ व्या शतकातील एक इटालियन गाणे ‘ला मंटोवना’शी प्रेरित आहे. ‘ला मंटोवना’ ला पोलंड, स्‍पेन, यूक्रेनमध्ये वेगवेगळ्या रुपात वापरलं गेलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सूर चोरल्याप्रकरणी मलिक यांच रेकॉर्ड गजब आहे. एका रेकॉर्डनुसार, मलिक यांनी ६० हून अधिक गाण्यांचे सूर चोरले आहेत. किंवा त्याच्याशी प्रेरित आहेत.

मलिक यांनी नुसरत फतेह अली खान यांच्या अनेक कव्‍वाली, गाणी बॉलीवूड चित्रपटात वापरले. उदाहरणार्थ -मेरा पिया घर आया, लोए लोए… चले जैसे हवाएं सनन सनन, नहीं जीना प्‍यार बिना…. इत्यादी.

हे देखील वाचलंत का?

Back to top button