युवराज-मरियम : बांधली हिंदू-मुस्लिम ऐक्याची गाठ

युवराज-मरियम : बांधली हिंदू-मुस्लिम ऐक्याची गाठ
युवराज-मरियम : बांधली हिंदू-मुस्लिम ऐक्याची गाठ

पुणे; भाग्यश्री जाधव : सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता पण आम्ही दोघंही आमच्या मतावर ठाम राहिलो. घरच्यांना समजावले. त्यानंतर त्यांचा विरोध मावळला आणि आमचा विवाह घरचांच्या समतीने पार पडला याचा आनंद वाटतो. हे बोल आहेत युवराज-मरियम यांचे. धर्मभेद टाळून देश जोडण्याचे काम नवी पिढीच करू शकते. त्यासाठी कोणीतरी पुढं आलं पाहिजे, असा आत्मविश्वास बाळगून युवराज-मरियम विवाहबद्ध झाले.

संतोषनगर, कात्रज येथील युवराज मोरे आणि खडकी येथील मरियम शेख हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला आहेत. एक वर्षांपासून ओळख, मैत्रीचं रूपांतर प्रेम आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झाले.

युवराज आणि मरियमने घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगितले. तेव्हा मरियमच्या वडिलांनी युवराजला घरी बोलावले. आणि युवराजला घरच्यांना घेऊन यायला सांगितले.

त्यानंतर बोलणी झाली पण चार महिन्यांचा वेळ लागला घरच्यांच्या होकाराला.

सुरुवातीला मरियमच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता.

समाज, नातेवाईक हे काय म्हणतील. केवळ जात नाही तर धर्म बदल यामुळे वडील नकार देत होते. पण युवराज आणि त्यांच्या घरचे वातावरण पाहून वडील तयार झाल्याचे मरियमने सांगितले.

दोघांचाही संयम कामी आला

आम्ही दोघांनीही संयम ठेवला. आम्ही दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि घरच्यांना समजवायला यशस्वी झाले.

दोघांनी आपापल्या कुटुंबियांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. त्याला चार महिन्यांनी यश आले, असे युवराज सांगितले.

या लग्नाला कुठल्या समाजाचा, नातलगांचा विरोध नाही ना. काही कुठला धार्मिक दबाव नाही.

दोन्ही घरच्यांनी रितसर बोलणी केली आणि हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला.

विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबानी एकच हिंदू पद्धतीने पत्रिका छापली.

जातीधर्माच्या भिंती पार करून युवराज आणि मरियम विवाहबद्ध झाले.

मानवता प्रतिष्ठानच्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात युवराज आणि मरियमचा विवाह झाला.

तरुणांना चुकीचे पाऊल उचलायला नाही पाहिजे. घरच्यांना समजावून सांगितले पाहिजे. विश्वासात घेतले पाहिजे.

दोऩ्ही कुट्ंब जुळून आले तर त्यांच्या आशिर्वादने पुढचा संसार सुखाचा होतो.

मरियम शेख

 

नवीन पिढीली आता गरज आहे ते म्हणजे जात -धर्म न पाहाता समाजाला एकत्र करण्याची गरज आहे. हा विचार डोक्यात ठेऊन आम्ही पाउल उचलले. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.

युवराज मोरे

 

मानवता प्रतिष्ठानच्या मानवजोड अभियानाचा भाग म्हणून सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळ्याला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. हिंदू मुस्लिम धर्मांना जोडणारा पहिला आंतरधर्मीय विवाह पार पडला आणि मानवता प्रतिष्ठानचा राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा उद्देश सफल झाला.

विकासनाना फाटे, मानवता प्रतिष्ठान अध्यक्ष

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news