जिप्सी चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच; क्लॅपबॉय झाला दिग्दर्शक | पुढारी

जिप्सी चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच; क्लॅपबॉय झाला दिग्दर्शक

मुंबई; पुढारी ऑनलाईन : जिप्सी चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले. जिप्सी हा शब्द मराठी माणसांना कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेमुळे माहित आहे. पण, आता याच नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटातून शशी चंद्रकांत खंदारे दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

अधिक वाचा – 

gypsi क्लॅपबॉय ते दिग्दर्शक

विशेष म्हणजे क्लॅपबॉय ते दिग्दर्शक असा शशी चंद्रकांत खंदारे यांचा प्रवास आहे. आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे.

अधिक वाचा –

या चित्रपटाचं टीजर पोस्टर रिलीज करण्यात आलं. यश सणस फिल्म्स, बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने निर्मिती होत आहे.

अधिक वाचा – 

खंदारे दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट करत आहेत. चित्रपटाची कथा देखील त्यांचीच आहे. पुढील महिन्यात चित्रीकरण सुरू होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा ३ राज्यात चित्रीकरण होणार आहे.

चित्रपट प्रवासावर आधारित आहे. पण, टीजर पोस्टरमध्ये मोकळं आकाश दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा काय असेल. याची उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

हेदेखील वाचलंत का? – 

Back to top button