अजित पवार यांचा सांगली दौरा : भिलवडी पूरग्रस्त भागाला भेट | पुढारी

अजित पवार यांचा सांगली दौरा : भिलवडी पूरग्रस्त भागाला भेट

सांगली; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली येथील भिलवडी पूरग्रस्त भागाला भेट दिली. अजित पवार यांनी भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर निवारा केंद्राला भेट दिली.

अधिक वाचा – 

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या.

अधिक वाचा- 

पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याची माहिती घेतली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो, अशा घरांचा सर्व्हे करा.

अधिक वाचा – 

वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करावे. यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा. अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

ajit pawar
अजित पवार

पुनर्वसन आणि मदतीसाठी आश्वासन

भिलवडी गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा अजित पवारांनी ऐकल्या. नंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

भिलवडी बाजारपेठेची त्यांनी बोटीतून पाहणी केली.

भिलवडी येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भिलवडी परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली.

स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेटी दिल्या. पूरग्रस्तांशी संवाद साधला व परिसराची पाहणी केली.

अधिक वाचा – 

 पाहा व्हिडिओ – अपघातग्रस्तांची जीवन रक्षक १०८ अम्ब्युलन्स

 

Back to top button