Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीच्‍या ‘एकजुटी’साठी राहुल गांधी सरसावले

राहुल गांधी. संग्रहित छायाचित्र
राहुल गांधी. संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजपविरोधी इंडिया आघाडीमधील नेत्‍यांमधील मतभेद लोकसभा निवडणुकीपूर्वीच स्‍पष्‍ट झाले आहेत. पश्‍चिम बंगालमध्‍ये ममता बॅनर्जी यांनी स्‍वबळावर निवडणूक लढवत सर्वप्रथम इंडिया आघाडीला धक्‍का दिला होता. मात्र यानंतर त्‍यांनी आमचा बाहेरुन पाठिंबा असल्‍याचे स्‍पष्‍ट करत सारवासारव केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत इंडिया आघाडीच्‍या एकजुटीसाठी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी सरसावले आहेत.

माझे मत 'आप'ला, केजरीवालांचे मत काँग्रेसला

नवी दिल्‍लीमध्‍ये इंडिया आघाडीच्‍या उमेदवारांच्‍या समर्थनार्थ शनिवारी ( दि. १८) आयोजित प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्‍हणाले की, "आम आदमी पार्टी (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल हे काँग्रेसला मतदान करतील तर मी आम आदमी पार्टीला मतदान करणार आहे. यावेळी त्‍यांनी दिल्लीच्या चांदनी चौकासाठीच्‍या आराखडाही सादर केला. तसेच काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय राजधानीतील सर्व सात लोकसभा जागांवर त्यांच्या आघाडीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींना पुन्‍हा चर्चेसाठी आव्‍हान

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील भारताच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी आव्हानही दिले. मी पंतप्रधान मोदी यांच्‍याशी कुठेही चर्चा करायला तयार आहे; पण मला खात्री आहे की ते येणार नाहीत. पंतप्रधान त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नांवर प्रश्नांवर उत्तरे देता येणार नाहीत, असा दावाही त्‍यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्‍लीत सोमवार, २५ मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news