कोल्‍हापूर महापूर : पुणे महापालिकेचे १७ टँकर कोल्‍हापूरमध्‍ये दाखल

पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर  कोल्हापूरला रवाना करण्यात आले.
पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरला रवाना करण्यात आले.

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे कोल्‍हापूर शहराला महापुराचा वेढा पडला. जलशुद्धीकरणाचे प्लांटस बंद पडले. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. त्यात कोल्हापूर महापालिकेकडे पाणी पुरवठा करणारे टँकर अपुऱ्या संख्येत आहेत. त्‍यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी पुणे महापालिकेकडे पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मदत व्हावी, अशी विनंती केली होती.

अधिक वाचा 

पुणे महापालिकेच्‍या प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरला रवाना करण्यात आले. टँकर्सबरोबर सुपरवायझर, इलेक्‍ट्रीशियन असे एकुण २१ जण आज (दि. २६) सकाळी कोल्‍हापूरमध्‍ये दाखल झाले.

पावसामुळे पुण्यासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि कोकण या शहरांमध्ये खूप नुकसान झाले आहे. कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यात कोल्हापूर महापालिकेकडे टँकर अपुऱ्या संख्येत उपलब्ध आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करण्‍यास अडचणी येत आहेत.

अधिक वाचा 

कोल्हापूर आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेकडे टँकरची मदत व्हावी, अशी विनंती केली. प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर काल कोल्हापूर ला रवाना करण्यात आले. टँकर्सबरोबर सुपरवायझर, इलेक्‍ट्रीशि असे एकूण २१ जण आज सकाळी कोल्हापूरला पोहोचले.

अधिक वाचा 

साधारण एक आठवड्याच्या कालावधीची तयारी करण्यात आली आहे. या कालावधी मध्ये सगळ्यांच्या निवासाची तसेच खाण्याची सम्पूर्ण सोय कोल्हापूर महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा सुरु ठेवण्यात आलेली आहे. वेळेत व तत्काळ मदत केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिका आयुक्‍तांनी पुणे महापालिकेचे आभार मानले आहेत.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news