Milk Benefits : दूध पिण्‍याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का..? | पुढारी

Milk Benefits : दूध पिण्‍याचे 'हे' फायदे माहीत आहेत का..?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संयुक्‍त राष्ट्र संघटनेच्या वतीने ‘युनो’च्या ‘एफएओ’च्या (अन्‍न आणि कृषी संघटना) वतीने यावरच लक्ष केंद्रीत करत दरवर्षी एक जून रोजी जागतिक दूध दिन (World Milk Day) म्हणून साजरा केला जातो. यातून दुधाचे महत्त्व, आहारातील गरज स्पष्ट करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यानिमित्ताने आज आपण दुधाचे आश्चर्यकारक फायदे (Milk Benefits) पाहूया.

Milk Benefits : दूध पिण्‍याचे आश्चर्यकारक फायदे 

दूध आराेग्‍यासाठी पाेषक असल्‍याने त्‍याचा समावेश आहारात केला जाताे. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे आराेग्‍य सदृढ राहते. दुधाचे सेवन करणे लाभदायक मानतात.

दात मजबुती

दररोज दूध पिल्‍याने दात मजबूत होण्यास मदत होते. दात किडणे, दातदूखी या त्रासापासून तुम्ही वाचाल. मात्र दूध गरम करुन प्या.

हाडे मजबूत

दुधामधील फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘ड’ हे  घटक  हाडे मजबूत करण्यासाठी  मदत करतात. तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर दररोज दुधाचे सेवन करा.

वजन कमी होण्यास मदत 

 जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या आहारात दुधाचा समावेश नक्की करा. दूध पिल्याने पोट आपले भरलेले राहते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

चांगल्या झोपेसाठी 

झोपण्यापूर्वी जर तुम्ही  दूध पिल्यास शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होते. मात्र दूध हे कोमट असावे. दुधामूळे आपले स्नाचू शिथील होण्यास मदत होते. 

ह्दयाच्या आरोग्यासाठी

अलिकडे ह्दयाच्या आजाराचे प्रमाण वाढल्याचे आपल्याल क्षात येईल. पण तुम्हाला हे माहीत आहे का?  दुधाचे दररोज सेवन केल्याने ह्दयाचे स्वास्थ चांगले राहण्यास मदत होते. उदा. दूधातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते

(दूधाचे सेवनाचे अनेक फायदे आहेत. मात्र वय व आराेग्‍य याचा विचार करा तसेच दरराेज आहारात दुधाचा समावेश करण्‍यापूर्वी   डॉक्टरांचाही सल्ला घ्या)

हेही वाचलंत का?

Back to top button