Gold Price Today : बजेटच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर स्थिर, जाणून घ्या आजचा दर | पुढारी

Gold Price Today : बजेटच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर स्थिर, जाणून घ्या आजचा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ सादर होण्यापूर्वी (Union Budget 2022) मंगळवारी सोन्याचा दर (Gold Price Today) स्थिर पातळीवर खुला झाला. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोने प्रति १० ग्रॅम ४७,६५० रुपयांवर व्यवहार करत होते. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत सोन्याचा दर किंचित वर असल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दरदेखील स्थिर आहेत. भारतीय बाजारात २ दिवसांच्या नकारात्मक परिस्थितीनंतर मंगळवारी सोन्याचे भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

२०२० मध्ये सोने दरात मोठी तेजी आली होती. दोन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. त्यानंतर दरात चढ-उतार सुरुच आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button