Budget 2022 : केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी! | पुढारी

Budget 2022 : केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आलेल्या ‘मोदी २.०’ चा चौथा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत ११ वाजता सादर करतील. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसाधारण अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे-दळणवळण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

Back to top button