बेळगाव : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार भव्यदिव्य | पुढारी

बेळगाव : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार भव्यदिव्य

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज बेळगावामधील विविध संघटनांचे प्रमुख आणि अभ्यासक यांची बैठक पार पडली. यावेळी लोकार्पण सोहळा भव्यदिव्य करण्याचा निश्चय करण्यात आला.

बेळगावच्या वैभवात भर घालणारे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक शहराचा केंद्रबिंदू आहे. धर्मवीर संभाजी चौकातील या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज बैठक पार पडली. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा बेळगावच्या लौकिकाला साजेसा असा साजरा केला जाईल.”

या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे, मराठा समाजाचे नेते प्रकाश मरगाळे, दत्ता जाधव, रमेश रायजादे, गुणवंत पाटील, शहर देवस्थान अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे, शहर अध्यक्ष विश्वनाथ पाटील, परशराम कोकितकर, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंइस्कर, विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव, हेमंत हावळ, रामसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, नगरसेवक संतोष पेडणेकर, शंकर पाटील, जयतीर्थ सौन्दती, प्रवीण पाटील, संजय जाधव, विकास कलगटगी, विनायक पवार, राहूल जाधव, योगेश कलघटगी, नितीन जाधव, श्रीनाथ पवार, अभियंता मुरलीधर बाळेकुंन्द्री, आदित्य पाटील, निशा कुडे, ओमकार पुजारी, गिरीश पाटील, प्रथमेश किल्लेकर, मनोज काकातकर, वैभव धामणेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक गुणवंत पाटील यांनी तर आभार सुनील जाधव यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button