महाराष्ट्र केसरी बनला शिवराज राक्षे, पण चर्चा फक्त सिकंदरचीच; सोशल मीडियावर पंचांनी अन्याय केल्याची भावना

महाराष्ट्र केसरी बनला शिवराज राक्षे, पण चर्चा फक्त सिकंदरचीच; सोशल मीडियावर पंचांनी अन्याय केल्याची भावना

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्र केसरी झालेल्या पुण्याच्या शिवराज राक्षेसोबत पैलवान सिकंदर शेखबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये त्याच्यावर अन्याय झाल्याने त्याच्या पाठीशी सर्व चाहते उभे राहिले आहेत. या गोष्टीवर स्वतः सिकंदरने भाष्य केलं आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून पैलवान सिकंदर शेखकडे ही अनेकाच्या नजर सर्वांच्या होत्या. त्यामुळेच सेमिफायनलमध्ये त्याच्यावर पंचांनी मोठा अन्याय केला, अशा अशी चर्चा गेले दोन दिवस सोशल मीडियावर सुरू आहे. उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याच्याकडून सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे दुःख आपल्याला झाल्याचं सिकंदरने म्हटलं असून त्याच्यावर अन्याय झाल्याचं अप्रत्यक्षरीत्या सांगितलं आहे. मात्र, त्याचा कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून दाखवेल, असा विश्वास ही त्याने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला.

सिकंदर शेख म्हणाला की, मी सोशल मीडियावरील सर्व प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. मी तुमच्या या प्रेमाबद्दल सर्वांचा आभारी आहे. सर्वांना वाटतंय की, मी महाराष्ट्र केसरी व्हायला हवं होतं. माझ्या पराभवामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सध्याच्या घडीला कोणाला कुस्ती कळत नाही असं कुणी महाराष्ट्रात नाही. त्यामुळेच माझ्यावर अन्याय झाला की नाही याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता, असं देखील सिकंदर म्हणाला.

मी सर्वांना आवाहन करतो की, तुमचं माझ्यावर असणारं प्रेम कायम असू द्या. तुम्ही काहीजण माझ्यासाठी रडलात. मी तुम्हाला आश्वासन देतो की, पुढील वेळेस नक्की महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेन, असंही सिकंदर म्हणाला. पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडनं पराभूत केलं. या लढतीत पंचांनी सिकंदर शेखवर अन्याय केला असल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news