बेळगाव : कोल्हापूरच्या धर्तीवर आता बेळगावातही शेणी गोवऱ्यांवर मोफत होणार अंत्यसंस्कार

बेळगाव : कोल्हापूरच्या धर्तीवर आता बेळगावातही शेणी गोवऱ्यांवर मोफत होणार अंत्यसंस्कार

बेळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जनतेला अंत्यसंस्कावेळी विविध समस्यांचा सामना करावा लागताे. अशा वेळी गोरगरीब जनतेला अंत्यविधीचा खर्च कमी करणेसाठी बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावात मोफत अंत्यविधी व्यवस्था करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. बेळगावच्या शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत शेणी गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

शहापूर स्मशानभूमीच्या विकास कामांसंदर्भात मुक्ती धाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने गेली अनेक वर्षे विकासकामे करत आहेत. स्मशानभूमीतील समस्येबाबत मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाकडून स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्काराची योजना सुरू केली.

पुढील काळात एक कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येईल. शेणाच्या गोवऱ्यांवर गावक-यांसाठी मोफत अंत्यसंस्कार होणार असल्याने गावकऱ्यांच्या दुःखाच्या काळात आर्थिक अडचणी कमी होणार आहेत, असे असे आमदार अभय पाटील सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news