सोशल मीडियावरील खोट्या पोस्टवर कारवाई होणार | पुढारी

सोशल मीडियावरील खोट्या पोस्टवर कारवाई होणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर खोट्या व भ्रामक पोस्ट टाकून प्रचार करणाऱ्या राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.६) कडक शब्दात समज दिली आहे. खोट्या व भ्रामक पोस्ट तीन तासांच्या आत हटवल्या नाही, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.

सोशल मीडियावरील प्रचारात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने काही निर्देश जारी केले आहेत. डीप फेक व्हिडिओ बनविण्याच्या आणि एआयवर आधारित उपकरणांच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० आणि माहिती व तंत्रज्ञान (मध्यवर्ती दिशानिर्देश व डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम २०२१ तसेच भारतीय दंड संहिता आणि जनप्रतिनिधित्व कायदा १९५० आणि १९५१ अंतर्गत निवडणूक आयोगाने दिशानिर्देश जारी केले आहेत. डीपी फेक ऑडियो, व व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासह महिलांचा अवमान करणाऱ्या पोस्ट तसेच प्रचारासाठी बालक आणि प्राण्यांची हिंसा दर्शविणाऱ्या पोस्ट प्रसिद्ध केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button