बेळगाव : अवकाळीने उत्पादन घटले; पंधरवड्यात दर कमी होण्याची शक्यता | पुढारी

बेळगाव : अवकाळीने उत्पादन घटले; पंधरवड्यात दर कमी होण्याची शक्यता

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव बाजारपेठेत भाजी दराने शंभरी गाठल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने बाजारात भाजीचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळेच भाजी दर वाढल्याची माहिती व्यापार्‍यांकडून देण्यात येत आहे. पण, त्यामुळे सामान्य नागरिकांचे रोजचे आर्थिक गणित कोलमडले आहे. भाजी दर कमी होण्यास किमान पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. कंग्राळी, आंबेवाडी, सुळगा, बेनकनहळ्ळी, मंडोळी, पिरनवाडी, वडगाव, शहापूर, येळ्ळूर, अलारवाड, बसवण कुडची, मुतगा, निलजी, कणबर्गी, मुचंडी या शहराजवळ असणार्‍या गावांतून भाजीची लागवड प्रामुख्याने करण्यात येते.

सोलापूर : द्राक्ष निर्यात करण्यास शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे सावट; जागेवर द्राक्ष विक्री करण्यावर शेतकर्‍यांचा भर

परंतु, यावर्षी डिसेंबरपर्यंत झालेल्या पावसाने भाजीची लागवडच वेळेवर करता आली नाही. परिणामी भाजीची आवक कमी झाली आहे. मागणीच्या प्रमाणात भाजी उपलब्ध नसल्याने व्यापार्‍यांना कसरत करावी लागत आहे. यातून भाजी दराचा भडका मागील महिनाभरापासून उडाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जय किसान भाजी मार्केटमध्ये भाजीची आवक होत आहे. परंतु, दरामध्ये वाढ झाली आहे. तेथून खरेदी करून विकणार्‍या किरकोळ भाजी विके्रत्यांकडून ग्राहकांना भाजी पुरवठा केला जाता मकर संक्रात सणानिमित्त भाजीची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. याचकाळात भाजीच्या दराने शंभरी गाठल्याने सणावरच संक्रांत आली आहे. कोणत्याही भाजीचा दर 50 रु. प्रति किलोपेक्षा कमी नाही. वांगी, भेंडीसारख्या भाज्यांनी शंभरी गाठली आहे.

एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

बेळगाव बाजारपेठ : भाजीचे दर का वाढले?

तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात कापणीनंतर भाजीची लागवड करतात. भात कापणी नोव्हेंबरमध्ये संपते. परंतु यावर्षी आवकाळी पावसाने याचकाळात झोडपून काढल्याने शिवारातून पाणी भरले. यातून भाजी लागवडीला विलंब झाला. परिणामी भाजीचा तुटवडा निर्माण झाला असून, दरात वाढ झाली आहे.

बेळगाव बाजारपेठ : सोले दर प्रति किलो 200 रु.

मकर संक्रांतीसाठी अनेक भाज्यांना मागणी वाढते. भोगीसाठी भाजीची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. यामध्ये सोल्याने महागाईचा उच्चांक गाठला. सोल्यांचा दर गुरुवारी प्रति किलो 200 रु. झाला होता.

घाटेअळी चा हरभरा पिकावर हल्लाबोल

बेळगाव बाजारपेठ – युवराज कदम, अध्यक्ष, एपीएमसी बेळगाव :

एपीएमसीमध्ये भाजीची आवक सुरू आहे. परंतु मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीचे उत्पादन कमी झाले. परिणामी सध्या बाजारात भाजीचे दर वाढले आहेत.

बेळगाव बाजारपेठ – दिवाकर पाटील, अध्यक्ष, जयकिसान भाजी मार्केट, बेळगाव :

अवकाळी पावसाने भाजीचे नुकसान झाले. बाजारात मागणीपेक्षा कमी प्रमाणात भाजी आहे. यातून सध्या भाजीचे दर वाढले आहेत. येत्या पंधरा दिवसात भाजीची आवक वाढून दर कमी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : व्हिडिओ व्हायरल! माकडाच्या मृत्यूनंतर मुंडन अन्‌ तेराव्याला भोजन, १५०० लोकांची गर्दी |

Back to top button