लखनऊ : पुढारी वृत्तसेवा
एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांच्या निधनानंतर पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ते एनडीटीव्हीत कार्यकारी संपादक होते.
आज सकाळी त्यांच्या निवासस्थानीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. ते लखनौच्या बटलर पॅलेस येथील सरकारी बंगल्यात राहत होते. त्यांची पत्नी रुची कुमार यादेखील पत्रकार आहेत.
त्यांना रामनाथ गोयंका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
मनिष सिसोदिया म्हणाले, कमाल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काल रात्रीपर्यंत रिपोर्टिंग करणारे ते आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ('ज़िंदगी तो बेवफ़ा है एक दिन ठुकरायेगी मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी' यकीन नहीं हुआ था, लेकिन ये सत्य है मेरे वरिष्ठ सहयोगी kamal khan अब इस दुनिया मे नहीं रहे देश ने एक बेहतरीन पत्रकार और एक शानदार इंसान खो दिया 'लखनऊ से kamal khan NDTV इंडिया' ये लाइन ताउम्र याद रहेंगी)