मुंबई पालिकेवर टीका करणारे किती जण काम करतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल | पुढारी

मुंबई पालिकेवर टीका करणारे किती जण काम करतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोविड काळात कौतुकासाठी नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम केलं. आपलं कौतुक घरच्यांनी नव्हे तर कोर्टाने केलं. मुंबई महापालिकेचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. myBMC Assist WhatsApp Chatbot लॉन्च प्रसंगी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सुविधेचे लोकार्पण करत संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. (myBMC Assist WhatsApp Chatbot)

ठाकरे म्हणाले, पालिकेवर टीका करणारे किती जण काम करतात. मनपाच्या ८० सेवा सुविधांची माहिती मिळणार आहे. मुंबई पालिका देशातील उत्तम पालिका आहे. सर्वजण म्हणतात की, पालिका श्रीमंत आरहे. तुम्हाला परवडंत. पण, हे जरी खरं असलं तरी, येथील कमगार गटारी स्वच्छ करता, कचरा उचलतात. शहर स्वच्छ ठेवणं ही नगरिकांचीही जबाबदारी आहे.

कोणीतरी कौतुक करावं म्हणून काम करत नाही. मत मागणारी वाकलेली लोक मतं मिळाल्यावर ताठ होतात. टीका करणारी लोक किती काम करतात, हे सर्वांना माहिती आहे. या वर्षाची सुरुवात चांगल्या कामांनी झालीय. सरकारमधील सहकारी यांची साथ मिळाल्याने काम सुलभ झालं, असेही त्यांनी नमूद केलं.

 

Back to top button