थर्टी फर्स्ट पार्टी आली अंगलट : ‘बकर्‍या’ने केले फाैजदाराला निलंबित! | पुढारी

थर्टी फर्स्ट पार्टी आली अंगलट : 'बकर्‍या'ने केले फाैजदाराला निलंबित!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
थर्टी फर्स्ट दिवशी मस्‍त पार्टी करावी. व्‍हेज, नॉनव्‍हेज डिशवर मनसोक्‍त ताव मारावा, असेच अनेकांचे प्‍लनिंग असते. मात्र थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची पार्टी ओडिशातील फौजदाराला भलतीच महागात पडलीय. थर्टी फर्स्टची पार्टी जोरात झाली;पण याची मोठी किंमत त्‍याला मोजावी लागली. बकरी चोरी प्रकरणी फौजदार निलंबित होण्‍याच्‍या घटना ओडिशातील बोलांगीर जिल्‍ह्यात घडली आहे.

थर्टी फर्स्ट पार्टी : पोलिस ठाण्‍याच्‍या आवारात आलेल्‍या बकरीवर डल्‍ला

बोलांगीरमधील सिंधीकेला पोलिस ठाण्‍यात फौजदार सुमन मल्‍लिक कार्यरत होता. थर्टी फर्स्टच्‍यादिवशी पोलिस ठाण्‍याच्‍या आवारात दोन बकर्‍या चरण्‍यासाठी आल्‍या. सुमन मल्‍लिक याची नजर त्‍यांच्‍यावर पडली. रात्रीच्‍या पार्टीसाठी त्‍याने यातील एक बकरी थेट उचलली. आपल्‍या सहकार्‍यांनाच तिला कापायला लावले, असा आरोप बकरी मालक संकीर्तन गुरु यांनी केला आहे.

बकरी मालकाच धमकवले, नागरिकांची पोलिस ठाण्‍यासमोर निदर्शने

पोलिस कर्मचारी बकरी कापत असताना माझ्‍या मुलीने पाहिले आहे, असा दावाही संकीर्तन यांनी केला. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्‍यांनी मल्‍लिक याच्‍याकडे केली. मात्र पोलिसांनी संकीर्तन त्‍यांनाच धमकी देत परत पाठवलं. याची माहिती स्‍थानिकांना मिळाली. संतप्‍त नागरिकांनी पोलिस ठाण्‍यासमोर निदर्शने केली. पोलिस अधीक्षकांना संपर्क करत याप्रकरणी तक्रार दाखल करण्‍याची मागणी केली. पोलिस अधीक्षकांनी तक्रार दाखल करत फौजदार सुमन मल्‍लिक याला निलंबित केले आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. सिंधीकेला येथे फौजदाराने केलेल्‍या थर्टी फर्स्टच्‍या पार्टीची चर्चा जोरात रंगली आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button