

पुढारी ऑनलाईन डेस्क
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पश्चिम बंगाल सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. (COVID in West Bengal ) राज्यात उद्यापासून ( दि. ३) शाळा आणि कॉलेजसह सार्वजनिक बागा आणि केशकर्तनालयही बंद राहणार असल्याचे आज सरकारने स्पष्ट केले.
मागील काही दिवस पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (COVID in West Bengal ) वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकारने शाळा, कॉलेज, विद्यापीठ, स्पा सेंटर, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर, मनोरंजन पार्क आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोमवारपासून सर्व सरकारी आणि खासगी कार्यालय ५० टक्के क्षमतेनेच सुरु राहिल. प्रशासनाच्या सर्व बैठका व्हिर्चुअलही होतील, असे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच. के. द्विेदी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?