

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आलं. सारं काही बदललं. कोरोना महामारी काही दिवसांमध्ये आटोक्यात येईल, असे प्राथमिक चित्र होते;पण गेली दोन वर्ष या विषाणूने संपूर्ण मानवजातीला वेठीस धरले आहे. कोरोना विषाणूचा नवाव्हेरियंट ओमायक्रॉनचे संकटामुळे सर्वच देश दहशतीखाली आहेत. आता कोरोनाचे हे संकट यावर्षी तरी संपणार का, या प्रश्नाचे उत्तर जागतिक
आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख (who chief) डॉ. टेड्रॉस अधानोम घेब्रेसस यांनी दिले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. घेब्रेसस म्हणाले की, आज जगातील सर्वच देश कोरोना संकटाचा मुकाबला करत आहेत. आता कोरोनाचा मुकाबलाकरण्यासाठी उपचार आहेत. तसेच लसही उपलब्ध आहे. मात्र यामध्ये असमानता आहे. काही देशांमध्ये उपचाराबरोबरच पुरेशी लसीचा साठाही आहे. तर काही देशांमध्ये कोणतीही सुविधा नाही. ही असमनाता कोरोनला पोषक ठरेल. याचा परिणाम खूपच घातक असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
आजही जगभारतील लाखो नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. काही देशांमधील संकुचित राष्ट्रवाद आणि लसीचा साठा केल्यामुळे वैद्यकीय सुविधांमधील असमानता स्पष्ट होत आहे. जगावर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे संकट असताना हे बाब धोकादायक ठरु शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
आपणास कोरोनावर मात कारायची असेल तर सर्वप्रथम जगातील असमानता नष्ट करावी लागेल. सर्वांना लस आणि उपचार मिळतील, याची खबरदारी घ्यावी लागेल.र आपण असमानता नष्ट केली तरच कोरोना महामारी नष्ट होईल. यासाठी संपूर्ण जगाने यासाठी एकत्रीत प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे डॉ. टेड्रॉस अधानोम घेब्रेसस यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?