Immunity Power : घरचं खा अन् प्रतिकारशक्ती वाढवा; रुजुता दिवेकरांचा सल्ला | पुढारी

Immunity Power : घरचं खा अन् प्रतिकारशक्ती वाढवा; रुजुता दिवेकरांचा सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जीवनातील सोप्या गोष्टीही माणसांसाठी अवघड होऊन बसल्या आहेत. पण, त्या साध्या-सोप्या गोष्टी स्वीकारल्या की, आपल्या आयुष्यातील अनेक आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात. त्यामध्ये घरचं अन्न खाणं, ८ तास झोपणं, स्क्रीन-फ्रीचा आनंद घेणं आणि  तणाव असलेल्या परिस्थितीपासून दूर राहणं या सगळ्या गोष्टी माणसाची प्रतिकारशक्ती वाढणारी ठरू शकतात आणि त्यातून आरोग्यही उत्तम राहू शकते. (Immunity Power)

कोरोनाचा नवा विषाणू असणाऱ्या ओमायक्राॅनच्या संसर्गाचा वेग वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती स्थिर ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करावे, असं सल्ले आरोग्य तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. यामध्ये प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर या आपल्या सोशल मीडियावरील फाॅलोअर्ससाठी आरोग्य टिप्स आणि फिटनेट मंत्र देत असतात.

रुजुता दिवेकर यांनी नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनोख्या शैलीत निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या काही टिप्स दिलेल्या आहेत. या टिप्समध्ये ‘घर का खाना’, ही महत्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण टिप्स आहे. गाजर, मका, हिरव्या पालेभाज्या, सूप  हे पदार्थ खाण्यासाठी हिवाळी ऋतू महत्वाचा ठरतो. (Immunity Power)

रुजुता दिवेकर यांनी आपल्या फाॅलोअर्सना रोग प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती वाढविण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ऊस, बोर, चिंच, आवळा आणि तिळगूळ यांसारखे पदार्थ खाण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर २०२२ मध्ये आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर मोबाईल स्क्रीनपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button