पुणे : कारवाई न करण्यासाठी पोलिस ठाण्यातच घेतली ८५ हजारांची लाच | पुढारी

पुणे : कारवाई न करण्यासाठी पोलिस ठाण्यातच घेतली ८५ हजारांची लाच

चाकण : पुढारी वृत्तसेवा

चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरिक्षकाने एका खासगी व्यक्तीच्या मदतीने 85 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि. २९) रात्री पोलिस ठाण्यातच कारवाई केली. यात एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले असून, एका तपासासाठी बीड येथे गेलेला उपनिरीक्षक तिकडूनच पसार झाला आहे.

पुणे : कडुसमध्ये शेतकऱ्यांनी कांदा पिकात सोडली मेंढरे

अख्तर शेखावत अली शेख (वय ३५) असे अटक केलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७, ७ अ, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

पुणे : ‘भय इथले संपत नाही’, बिबट्या पाठ सोडेना!

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चाकण जवळील एका वाडीतील भावकीत जमिनीचा वाद होता. त्यावरून चाकण पोलिसांत तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

पुणे : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक; गुन्हा दाखल

एसीबीने बुधवारी पडताळणी केली. त्यात आरोपी अख्तर याने उपनिरीक्षक झेंडे यांच्या वतीने ७० हजार आणि स्वतःसाठी १५ हजार अशी एकूण ८५ हजार रुपये लाच तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. ही लाच घेताना एसीबीने अख्तर याला रंगेहाथ पकडले. दरम्यान उपनिरीक्षक झेंडे पसार झाले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांत गुरुवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.

हेही वाचा

पुणे : म्हाडाच्या चार हजार घरांसाठी 64 हजार अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ’इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे

पुणे जिल्ह्यात तब्बल 1660 बालके कुपोषित; 371 अतितीव्र कुपोषित

पुणे रेल्वे स्थानकातून सांगा बाहेर कसं पडायचं?

जम्मू- काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद

तर गृहयुद्ध भडकू शकते, नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरुन नेटकरी संतापले

 

Back to top button