पुणे : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक; गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा एजंट असल्याचे भासवून मुद्रा कर्ज देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फी स्वरूपात 2 लाख 80 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कात्रज येथे राहणार्‍या एका 32 वर्षीय महिलेनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : म्हाडाच्या चार हजार घरांसाठी 64 हजार अर्ज

गुन्हे निरीक्षक संगिता यादव यांनी सांगितले, फिर्यादी यांचा ट्रॅव्हलचा व्यावसाय आहे. कोरोना काळात त्यांच्या व्यावसायात तोटा झाला होता. त्यांना व्यावसायात वृध्दी करण्यासाठी कर्ज हवे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन कर्ज कोठे मिळते आहे का? अशी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांना अज्ञात मोबाईलधारक आरोपीचा फोन आला. त्याने फिर्यादी यांना प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ’इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे

वर्षभरानंतर दाखल केली तक्रार

फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने त्यांना कर्ज मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी स्वरूपात 2 लाख 80 हजार 675 रूपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरले परंतु, जानेवारी 2021 मध्ये कर्जासाठी प्रोसेस करूनही कर्ज न मिळाल्याने व आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महिलेनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठून पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक संगिता यादव करीत आहेत.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात तब्बल 1660 बालके कुपोषित; 371 अतितीव्र कुपोषित

पुणे : ‘भय इथले संपत नाही’, बिबट्या पाठ सोडेना!

पुणे रेल्वे स्थानकातून सांगा बाहेर कसं पडायचं?

पुणे महापालिका : प्रारुप प्रभाग रचनेतील बदलांना मुहर्त मिळाला

Ross Taylor : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा

तर गृहयुद्ध भडकू शकते, नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरुन नेटकरी संतापले

 

Back to top button