पुणे रेल्वे स्थानकातून सांगा बाहेर कसं पडायचं? | पुढारी

पुणे रेल्वे स्थानकातून सांगा बाहेर कसं पडायचं?

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची वाहने, टॅक्सी, कॅब, दुचाकी, तीनचाकींची संख्या वाढत आहे. परिणामी, येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असतानाही पार्किंगसाठी पोलिस प्रशासनाने स्थानकातून बाहेर पडणारी एक लेन (बाहेर जाणारा रस्ता) बॅरिकेड लावून अडवून ठेवली आहे. त्यामुळे स्थानकातून बाहेर कसे पडावे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

Pune Railway Station 1
लेन अडविल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी.

पुणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी दोन रस्ते आहेत. या दोन रस्त्यांपैकी एक रस्ता पोलिस प्रशासनाने आपली वाहने पार्किंग करण्यासाठी अडवून ठेवला आहे. प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता उपलब्ध असून, दुसरा बॅरिकेड लावून अडविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडणार्‍या प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. स्थानक परिसरात वाहनांच्या रांगा लागत असून, प्रवाशांना येथून बाहेर पडायलाच 10 ते 15 मिनिटे लागत आहेत. म्हणजे 2 मिनिटांच्या अंतरासाठी प्रवाशांना पिकअवर्समध्ये स्थानकातून बाहेर पडायला 10 मिनिटे लागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयीचा विचार करीत ही अडविलेली लेन पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

पुणे महापालिका : प्रारुप प्रभाग रचनेतील बदलांना मुहर्त मिळाला

रेल्वे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष…

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांनी स्थानकावरील लेन नंबर 1 अडवून वाहनांचे पार्किंग सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. असे असतानाही रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी गप्प का बसले आहेत, याकडे डोळेझाक का करीत आहेत, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

आशियाई लिफ्टिंग स्पर्धा : पुण्याच्या चार जणींना सुवर्णपदक

वाहतूक पोलिस करताहेत दादागिरी

पोलिसांनी रस्ता अडवून केलेल्या या पार्किंगमध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीने माहीत नसताना आपले वाहन पार्क केले, तर त्याच्यावर हल्लाबोल करायला येथे चार वाहतूक पोलिसांची टोळी आणि एक टोईंग व्हॅन तयारच असते. चुकून माहीत नसताना येथे वाहन पार्क केले, तर येथील वाहतूक पोलिस अरेरावीची भाषा करीत दादागिरी करतात अन् जोरदार दंडाची वसुली करतात. त्यामुळे येथील वाहतूक पोलिसांनी फक्त येथे वाहतुकीचेच नियोजन करावे आणि दंडवसुलीसोबतच फुकटची दादागिरी करू नये, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

Ross Taylor : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा

बेळगाव : एकसंबा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता; भाजपचा मोठा पराभव

जम्मू- काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद

Baba Vanga : बाबा वंगा यांची भविष्यवाणी कधी खरी ठरली आहे का? २०२२ साठी केली होती मोठी भविष्यवाणी

स्ट्राँग पासवर्ड, गोपनीय ओटीपीनेच फसवणूक थांबणार!

 

Back to top button