तर गृहयुद्ध भडकू शकते, नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरुन नेटकरी संतापले | पुढारी

तर गृहयुद्ध भडकू शकते, नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरुन नेटकरी संतापले

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘जर मुस्लिमांच्या हत्याकांडाची चर्चा झाली तर भारतातील मुस्लिम शांत बसणार नाहीत, ते लढतील. जर कोणाला आम्हाला चिरडायचे असेल तर ते सूड घेतील. होय, तसे झाल्यास, आम्ही ते करू. आम्ही आमचे घर, आमचे कुटुंब आणि आमच्या मुलांचे रक्षण करत आहोत.” असे बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांपासून ते हरिद्वार धर्मसंसदेपर्यंत अनेक गोष्टींवर आपले मत मांडले. या मुलाखतीच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नसीरुद्दीन शाह यांच्या बोलण्यावरून सोशल मीडियावर संघर्ष सुरू झाला आहे.

नसीरुद्दीन म्हणाले की, आजकाल मुघलांची वारंवार चर्चा होत आहे. ते विसरतात की मुघल हेच लोक आहेत ज्यांनी खूप योगदान दिले आहे. मुघलांनी येथे स्मारके, संस्कृती, नृत्य, कविता, चित्रकला, साहित्य अशा खूप गोष्टी दिल्या आहेत. तैमूर, नादिरशाह आणि गजनीबद्दल कोणी बोलत नाही. हे लोक लुटारू होते. ते आले, लुटले आणि निघून गेले. मुघलांबद्दल काय बोलावे…त्यांना काय म्हणणे योग्य ठरेल…त्यांना रिफ्यूजी… होय ते रिफ्यूजीसारखे होते.

मुस्लिम असणं काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. उत्तरात नसीरुद्दीन शाह म्हणाले, ‘मुस्लिम उपेक्षित आणि निरुपयोगी बनले आहेत. ते मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याच्या मार्गावर आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात हे घडत आहे.

35 मिनिटांच्या या मुलाखतीत शाह यांना विचारण्यात आलं की, ‘नरेंद्र मोदींच्या भारत’मध्ये एक मुस्लिम असणं काय वाटतं. यावर शाह म्हणाले, ‘मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचा प्रयत्न होतोय. आणि प्रत्येक क्षेत्रात हे घडत आहे.

हरिद्वार धर्मसंसदेबाबत ते म्हणाले, मला हे विचार करून आश्चर्य वाटते की हे लोक काय बोलत आहेत, याचा अर्थ त्यांना कळतो का? ते 200 दशलक्ष लोक (मुस्लिम) परत लढतील. आपण या देशाचे आहोत. आम्ही इथेच जन्माला आलो आणि आम्ही इथेच राहणार आहोत. हरिद्वार धर्मसंसदेतील हत्याकांडाच्या चर्चेमुळे गृहयुद्ध भडकू शकते, असेही ते म्हणाले.

Back to top button