SA vs IND: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकन संघ जाहीर | पुढारी

SA vs IND: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकन संघ जाहीर

केपटाऊन; पुढारी ऑनलाईन : SA vs IND : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या महिन्यात सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आफ्रिकन संघाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी मालिकेसाठी 34 वर्षीय अनुभवी फलंदाज डीन एल्गरला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर या मालिकेदरम्यान उपकर्णधारपदाची जबाबदारी 31 वर्षीय अनुभवी फलंदाज टेंबा बावुमाच्या खांद्यावर असेल. याशिवाय 28 वर्षीय खेळाडू क्विंटन डी कॉक यष्टिरक्षकाच्या भूमिकेत संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

द. आफ्रिकेच्या संघाने कसोटी (SA vs IND) मालिकेसाठी 21 खेळाडूंचा मजबूत संघ निवडला आहे. यापूर्वी या महिन्यात १७ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार होती, परंतु आफ्रिकन देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता आता २६ डिसेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. कसोटी मालिकेतील (SA vs IND) पहिला सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन पार्क येथे खेळवला जाईल. यानंतर या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान आणि तिसरा कसोटी सामना 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केपटाऊन येथे खेळवला जाईल. कसोटी मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 आणि 21 जानेवारीला पार्ली आणि तिसरा सामना 23 जानेवारीला केपटाऊनमध्ये होणार आहे.

द. आफ्रिकेचा संघ पुढील प्रमाणे आहे…. (SA vs IND)

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कागिसो रबाडा, सारेल आर्वी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, व्यान मुल्डर, एनरिक नॉर्खिया, कीगन पीटरसन , रासी वॅन डर डुसेन, काइल विरेन, मार्को जेन्सेन, ग्लेंटन स्टरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिचेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.

Back to top button