Rohit Sharma Captain : रोहित शर्मा होणार ODI चा कॅप्टन, द. आफ्रिका दौ-यासाठी BCCI संघाची घोषणा करणार | पुढारी

Rohit Sharma Captain : रोहित शर्मा होणार ODI चा कॅप्टन, द. आफ्रिका दौ-यासाठी BCCI संघाची घोषणा करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Captain : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. T20I मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. यानंतर, आता टीम इंडियाचे नवीन मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे, जो कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनमुळे सुमारे दहा दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होईल आणि त्यानंतर जानेवारीत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा होऊ शकते.

रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात येईल (Rohit Sharma Captain) अशी शक्यता आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौरा यापूर्वी हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार होता पण आता बॉक्सिंग डे कसोटीने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना प्रकारामुळे (ओमायक्रॉन) हा निर्णय घेण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज म्हणजेच मंगळवार, 7 डिसेंबर रोजी संघाची घोषणा केली जाऊ शकते. यासोबतच विराट कोहली भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार की रोहित शर्माची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली जाईल हे देखील समोर येईल (Rohit Sharma Captain). रोहित यापूर्वीच टी-20 संघाचा कर्णधार बनला आहे. याशिवाय आजच्या निवडीनंतर कसोटी क्रिकेटमधील नवा उपकर्णधार कोण असेल हेही निश्चित होईल. अजिंक्य रहाणे तंदुरुस्त असल्यास तो उपकर्णधारपदी कायम राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळू शकते आणि कोणता खेळाडू संघाबाहेर जाऊ शकतो याबद्दल चर्चा करूया. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी कसोटी संघात पुनरागमन करतील. अशा स्थितीत यष्टिरक्षक श्रीकर भरत आणि सूर्यकुमार यादव यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांनाही संघातून वगळले जाऊ शकते. सलामीवीर रोहित आणि केएल राहुल सोबत मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल देखील दक्षिण आफ्रिकेला जाणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Rohit Sharma Captain)

बीसीसीआयच्या एका अधिका-याने एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ‘विराटला सध्या वनडे कर्णधारपद राखणे कठीण आहे. यावर्षी फार कमी वनडे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे वनडे फॉरमॅटला फारसे महत्त्व देण्यात येईल असे वाटत नाही. अशा स्थितीत कर्णधार पदाच्या निर्णयाबाबत विलंब होण्याची शक्यता आहे. टी २० आणि वनडे फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असणे संघासाठी अडचणीचे ठरू शकते. मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला टी २० सह वनडे संघाच्य कर्णधार पदाची ही जबाबदारी सोपवली जावी, जेणेकरून त्याला २०२३ पूर्वी संघ तयार करण्यासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल, असे बहुतेकांना वाटते.’

Back to top button