Ranjit Gaikwad | पुढारी

Ranjit Gaikwad

Ranjit Gaikwad

रणजित गायकवाड हे सध्या पुढारी ऑनलाईनमध्ये सिनिअर कंटेंट एडिटर आहेत. त्यांनी एम. ए. मास कम्यूनिकेशन ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांना प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. रणजित हे राजकीय, क्रीडा, ग्रामीण, मनोरंजन, टेक, आंतरराष्ट्रीय, क्राईम डेस्कवर काम करतात. त्यांनी सर्व प्रकारच्या निवडणुका, संसद-विधिमंडळ अधिवेशन कव्हर केले आहे. क्रीडा आणि मनोरंजन हे रणजित यांचे आवडीचे क्षेत्र आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत आयपीएल, टी-20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक, फिफा वर्ल्डकप, आशिया चषक, कुस्ती स्पर्धा, कसोटी सामने, डब्ल्यूटीसी स्पर्धा, ग्रँड स्लॅम, हॉकी वर्ल्डकप, बॅडमिंटन यासारख्या क्रीडा स्पर्धा कव्हर केल्या आहेत. रणजित हे नाट्य कलावंत देखील आहेत. विविध एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने मोहोर उमटवली आहे. राज्यनाट्य स्पर्धेसह प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणात ते सहभागी असतात. त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त शॉर्ट फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शन म्हणून जबाबदारी सांभाळी असून प्रमुख भूमिकाही वठवलेल्या आहेत. अनेक माहितीपटांसांठी त्यांनी व्हाईस ओव्हर आर्टिस्टचे देखील काम केले आहे.
Back to top button